Farewell : सेवानिवृत्त सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. विनय कांबळे यांचा सपत्नीक सत्कार.

0

सावली पंचायत समितीत पार पडला निरोप समारंभ.
SAOLI | 01 August 2024
पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात कार्यरत डॉ. विनय कांबळे हे सेवानिवृत्त झाले असल्याने स्थानिक पंचायत समिती त्यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसह शुभेच्छा देण्यात आल्या.


या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉ.कापगते प्रमुख अतिथी म्हणून सप्रअ सौ. रश्मी पुरी, कप्रअ कीरण बोकडे, विस्तार अधिकारी संजिव देवतळे, पविअ सौ.सुवर्णा नखाते, डॉ.बंडु आकनुरवार यांचेसह पशुसंवर्धन विभागातील व पंंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


निरोप समारंभात सत्कारमुर्ती म्हणून डॉ.विनय कांबळे व त्यांच्या सौभाग्यवती लक्ष्मी कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक, सहा.संवर्ग विकास अधिकारी जगन्नाथ तेलकापल्लीवार यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
या निरोप समारंभाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. बंडू आकनुरवार यांनी तर आभार सौ.सुवर्ण नखाते यांनी मानले.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !