SINDEWAHI : रस्त्यांची दयनीय अवस्था बघुन पावसाळ्यात भुमिपुजनं?

0

ऐण पावसाळ्यात कामे होणार की आचारसंहिता लागल्यावर; नागरिक संभ्रमात..
SINDEWAHI | 21 JUNE 2024
शासन आणि रस्ता हे दोन्ही चालण्यासाठी बनवले जातात. सरकार सुरळीत चालत आहे; परंतू तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची मात्र दुरवस्था मोठी होऊन आहे. अशा या रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण वेळेत झाले तर स्थानिकांचे हाल कमी होऊ शकतात. 
परंतू विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपल्या मतदार संघातील सिंदेवाही तालुक्यात ऐण पावसाळ्याच्या तोंडावरच दि. १५ जून रोजी तब्बल सहा ठिकाणच्या रस्त्यांचे भुमिपुजने केल्याने या रस्त्यांची कामे पावसाळ्यात कशी पुर्ण होणार? की लवकरच लागणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ते पुढे ढकलल्या जाणार असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. 


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे मागील दहा वर्षांपासून ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार आहेत. मविआ सरकारच्या काळात ते जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होते. परंतू सिंदेवाही तालुक्यात रस्ते विकासाच्या बाबतीत त्यांनी भरीव अशी कामगिरी करता आली नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते पूर्णपणे उखडून रस्त्यावर मोठमोठी जिवघेणे खड्डे तयार झाल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यांची डागडुजी करून डांबरीकरण करण्याची मागणी स्थानिकांकडून अनेकदा केली जात असते. 


परंतु ऐण पावसाळ्याच्या तोंडावर आमदार वडेट्टीवारांनी तालुक्यातील मुरपार येथील राज्यमार्ग ३७५ (सिंदेवाही) स्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण व सिमेंट काक्रेट रोड बांधकाम, नवेगांव चक (फुटकी) येथे पोचमार्ग रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, चिकमारा फाटा ता. सिंदेवाही येथे रस्त्याचे मजबुतीकरणासह सुधारणा करणे, खैरी चक येथील रस्त्याचे मजबुतीकरणासह सुधारणा करणे, पवनपार फाटा येथील पवनपार रस्त्याचे मजबुतीकरणासह सुधारणा करणे आणि गुंजेवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील रस्त्याचे मजबुतीकरणासह सुधारणा करणे अशा सहा कामांचे भुमिपुजन संपन्न केल्याने ही कामे पावसाळ्यात खरोखरीच होणार आहेत काय? आणि विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असल्याने पुढे आचारसंहिता लागू झाली तर नागरीकांच्या पदरी पुन्हा निराशाच पडते की काय अशी भितीही नागरिकांमध्ये चर्चिल्या जात आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !