#HSCResults १२ वी (HSC) चा निकाल जाहीर!

0

🔹यंदाही मुलींचीच बाजी, कोकण विभाग राज्यात अव्वल!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दुपारी ०१ वाजता बारावी (HSC) चा निकाल जाहीर करण्यात आला असून 93.37 % टक्के निकाल लागला आहे.


विशेष म्हणजे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली. विभागवार निकालामध्ये कोकण विभाग अव्वल तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
आज पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी टक्केवारी बद्दलची सविस्तर माहिती माध्यमांना दिली.
त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला आहे.
पुणे 94.44 %
नागपूर 92.12 %
छ. संभाजीनगर 94.08 %
मुंबई 91.95 %(सर्वात कमी)
कोल्हापूर 94.24 %
अमरावती 93 %
नाशिक 94.71 %
लातूर 92.36%
कोकण 97.51% टक्के (सर्वात जास्त)

यामध्ये एकूण परीक्षार्थी 14 लाख 23 हजार 970 उत्तीर्ण परीक्षार्थी 13 लाख 29 हजार 684 होते तर 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल शंभर टक्के आहे. विज्ञान विभाग निकाल 97.82 कला शाखा निकाल 85.88, वाणिज्य विभाग निकाल 92.18, व्यवसाय अभ्यासक्रम 87.25 गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल 2.12 ने जास्त लागला आहे.

राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या. विशेष म्हणजे दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यात कॉपीमुक्त परीक्षा या पार पडल्या. परीक्षेची तयारी बोर्डाकडून कित्येक तरी दिवसांपासून केली जात होती. यंदा परीक्षा केंद्रांवर देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. हेच नाही तर भरारी पथकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ करण्यात आली.
बारावीची परीक्षा नऊ विभागांमध्ये पार पडल्या. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण.
यंदा बारावीची परीक्षा तब्बल 14 लाख विद्यार्थ्यांनी दिली. आता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दहावी (HSC) च्या निकालाची प्रतिक्षा प्रतिक्षा आहे. तथापि चाैथ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याचे बोर्डाकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले मात्र,
अद्याप तरी दहावीच्या निकालाची तारीख ही जाहीर करण्यात आलेली नाही.

लागलेला निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी-पालकांनी खालील संकेतस्थळांचा वापर करावा :-
https://msbshse.co.in / www.hscresult.mkcl.org /www.mahresult.nic.in / www.mahahsscboard.in


#HSC | #examresults |#Maharashtra

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !