सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचेहस्ते होणार सन्मान.
माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांचेकडुन अभिनंदन!
BRAMHAPURI । 18 NOVEMBER 2023
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत असणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालयामार्फत राज्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
कला आणि संस्कृतीच्या लोककला क्षेत्रातील अमूल्य योगदान विचारात घेऊन पुरस्कार निवड समितीने हिरालाल सहारे (हिरालाल पेंटर) यांच्या नावाची राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2022 या पुरस्कारासाठी शिफारस केलेली होती. या शिफारसीस अनुसरूनच पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी हा पुरस्कार घोषित केला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप आधी रोख रक्कम एक लाख रुपये होते. परंतु सुधीर मुनगंटीवार (sudhir Mungantiwar) यांनीच या रक्कमेत वाढ करून तीन लाख रुपये केले आहे. यानुसार 3 लाख रुपये रोख रक्कम, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.लवकरच एका भव्य कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर, भाजपा विधानसभा प्रमुख प्रा. कादरशेख, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे,शहराध्यक्ष इंजिनियर अरविंद नंदुरकर,भाजयुमो तालुका अध्यक्ष प्रा. रामलाल महादेव दोनाडकर, भाजयुमो शहराध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुद्धे, तसेच महामंत्री ज्ञानेश्वर दिवटे,व महामंत्री मनोज वटे तसेच भाजयमो महामंत्री प्रा.यशवंत आंबोरकर, भाजयुमो महामंत्री इंजिनियर अविनाश मस्के, भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष प्रेमलाल धोटे भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष प्रा.डॉ.अशोक सालोटकर, कार्यालय प्रमुख तथा प्रसिध्दी प्रमुख प्रा.संजय लांबे यांचे सह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हिरालाल सहारे यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.