दादागिरी फळाला, अर्थ खातं अजीत पवारांकडे..
MUMBAI । 14 JULY 2023
मागील अनेक दिवसांपासून रखडून असलेल्या राज्य मंत्रिमंडळातील बिनखात्याच्या मंत्र्यांना आज खातेवाटप जाहीर करण्यात आले.
राज्यपाल रमेश बैस यांच्या मंजूरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच हा बहुप्रतीक्षित खातेवाटप जाहीर केल्याने कही खुशी कही गम अशी परिस्थिती पहायला मिळत आहे.
आज जाहीर झालेल्या खातेवाटपाबरोबरच अनेक विद्यमान मंत्र्याच्या खात्यात बदलही केल्या गेले आहेत.
यामधे अजित पवारांना अर्थ व नियोजन खातं मिळविण्यात यश आलं असून राष्ट्रवादीतील मंत्र्यांसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांत फेरबदलही करण्यात आले.
आता राज्य मंत्रीमंडळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म यासोबत इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले खाते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा आणि राजशिष्टाचार ही खाती ठेवण्यात आली आहेत.
तर इतर २६ मंत्र्यांना पुढीलप्रमाणे खातेवाटप करण्यात आले आहेत.
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीप वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार गावित- आदिवासी विकास
गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय मुंडे - कृषि
सुरेशभाऊ खाडे- कामगार
संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत- उद्योग
प्रा. तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दिपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती तटकरे – महिला व बालविकास
संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन असे खातेवाटप करण्यात आले आहेत.
#Maharashtra #EknathShinde #devendrafadanavis #AjitAawar