Spyware: सावधान! तुमच्या फोनमध्ये घुसलाय स्पायवेअर..

0

गुपचूप रेकाॅर्डिंग आणि माहीतीही चोरतोय!
केंद्राकडून अलर्ट! काय कराल? 

MUMBAI । 19 JUNE 2023
Indian Computer Emergency Response Team ने एक धाेकादायक स्पायवेअर (spyware) शाेधून काढला असून हा स्पायवेअर गुपचुपपणे तुमच्या मोबाईलमधील गुप्त माहिती चाेरण्याबरोबरच मोबाईलच्या कॅमेराचा वापर करून तुम्हाला न कळताच रेकाॅर्डिंगदेखील करत आहे.


भारतातील ४२ काेटी ॲॅण्ड्राॅइड मोबाईलमध्ये हा स्पायवेअर शिरला आहे. 'स्पिन ओके' (SpinOk) असे त्याचे नाव असून प्ले स्टाेरमधील १०५ ॲप्सच्या माध्यमातून ताे पसरला आहे. या धोक्यासंदर्भात केंद्र सरकारने नुकत्याच मार्गदर्शक सूचना ही जारी केल्या आहेत.

आज जवळपास प्रत्येकाच्याच हाती स्मार्टफाेन दिसताे. त्यात सर्वाधिक प्रमाण ॲॅण्ड्राॅइडवर (Android) चालणाऱ्या स्मार्टफाेनचे आहे. या स्मार्टफाेनमध्ये प्ले स्टाेरवरून (Play store) आवश्यक Apps लाेक गरजेनुसार डाउनलाेड करतात. मात्र, मागचा-पुढचा विचार न करता अनेकजण धाेकादायक ॲप्स डाउनलाेड करतात. हे किती धाेकादायक ठरू शकतात याची सर्वसामान्यांना कल्पनादेखील नसते. स्पिन ओके स्पायवेअर हा जावा स्क्रिट काेडच्या माध्यमातून हळूहळू क्षमता वाढविताे. अतिशय कमी कालावधीत ताे माेठ्या प्रमाणात पसरला आहे.

स्पायवेअर ला कसे ओळखाल?
तज्ञांनी या स्पायवेअरपासून सुरक्षित राहण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. फाेनमध्ये अनेकदा जाहिराती अचानक सुरू हाेतात. तसे हाेत असल्यास हमखास स्पायवेअर तुमच्या फाेनमध्ये असू शकताे. गेल्या काही महिन्यात डाउनलाेड केलेले ॲप्स अशा वेळी अनइन्स्टाॅल (uninstall) करणेच याेग्य होईल, असे तज्ञांचे मत आहे.

SpinOk काय करत आहे?
- SpinOk हा तुमच्या फाेनमधील कॅमेरा वापरून गुपचूप रेकाॅर्डिंग करू शकताे.
-Data Copy करून अज्ञात रिमाेट सर्व्हरवर पाठवताे.
-मोबाईल कुठेही ठेवला असेल तरी आजूबाजूचे आवाज रेकाॅर्ड करत राहताे.
-Delate केलेल्या फाइल्सदेखील ताे रिकव्हर करू शकताे.

हे Apps वापरणे धाेकादायक :
नाॅइस व्हिडीओ एडिटर, जायपा, बियूगाे, एमव्ही बिट, क्रेझी ड्राॅप्स, टिक, व्ही फ्लाय, कॅश जाॅइन, कॅश ईएम, फिझ्झाे हे ॲप्स सर्वाधिक धाेकादायक आहेत. त्यापैकी जायपा आणि नाॅइस व्हिडीओ एडिटरचे १० काेटी, तर बियूगाे, एवव्ही बिट या ॲप्सचे ५ काेटी वापरकर्ते असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !