तालुक्यातील होतकरू मुला-मुलींना मिळणार ब्युटीपार्लर, शिवणकाम आणि कॉम्प्युटरचे मोफत प्रशिक्षण!
SINDEWAHI। 06 JUNE 2023
तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या ज्ञानगंगा मल्टिपर्पज फाउंडेशनच्या वतीने तीन माही चालणाऱ्या ब्युटीपार्लर, शिवणकाम आणि कॉम्प्युटर प्रशिक्षण शिबिराचे शुभारंभ शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. श्वेतल बंडावार यांच्या शुभहस्ते फीत कापून आज करण्यात आले.
सिंदेवाही तालुक्यातील गोरगरीब, होतकरू मुला, मुलींना रोगगारभिमुख शिक्षण-प्रशिक्षण मिळावे आणि त्यामाध्यमातून स्वतःचा व परीवाराचा आर्थिक तसेच सामाजिक विकास साधता यावा. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ज्ञानगंगा मल्टिपर्पज फाउंडेशन च्या वतीने शहरात प्रथमच हे तीन माही प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कालावधीत तालुक्यातील होतकरू मुला- मुलींसाठी ब्युटीपार्लर, शिवणकाम आणि कॉम्प्युटरचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून सिंदेवाही तालुक्यातील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील संस्थेकडून करण्यात येत आहे.
या शुभारंभाप्रसंगी, संस्थेच्या अध्यक्षा श्वेता मोहुर्ले, प्रशांत दांडवे, राजकुमार गुरनुले, मेघा निकोडे, ललिता खोब्रागडे, किरण बोरूले, शालिनी गुरनुले, अविशा कुळमेथे, आसावरी गुरनुले, गुरूदास शेंडे, सुधाकर सुरपाम, भुन्येश्वर पेटकुले आदींची उपस्थिती होती.