NCP : धर्मरावबाबा आत्राम यांना लोकसभेचे वेध!

0

सिंदेवाहीत राकाँची आढावा बैठक संपन्न..
SINDEWAHI । 09 JUNE 2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील जेष्ठ नेते, माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम (dharmrao baba atram) यांनी चिमूर पाठोपाठ सिंदेवाही तालुका राकाँची आढावा बैठक घेतली.
सदर बैठक जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजेंद्र वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक शासकीय विश्रामगृहात बुधवारी (दि. ७) पार पडली.


आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकरीता चिमुर-गडचिरोली लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून मी उमेदवार असणार आहे. त्यामुळे राकाँच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आता कामाला लागायची गरज आहे. त्यासाठी आतापासूनच संघटनाबांधणीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.  
येत्या काळात या उपेक्षित राहिलेल्या क्षेत्राचा कायापालट करण्याच्या दृष्टीने आपण संकल्प केला असून रोजगार, सिंचन आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर भर देऊन क्षेत्राचा विकास करावयाचा आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्रातून राकाँचा खासदार निवडून दिल्लीला पाठवायचा आहे. असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री, आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. 


या बैठकीला युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश सरचिटणीस प्रशांत घुमे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बेबी उईके, हिराचंद्र बोरकुटे, प्रफुल महाजन, सलीम पठाण, दामोधर नन्नावार, बबलू शेख, मुजीबउल्ला शेख, तुळशीदास खोब्रागडे, वहाबभाई सैय्यद,भगवानजी पगाडे, अंबादासजी कोसे, गिरीश धात्रक, राजेश्वर गायकवाड, राजू वानखेडे, चरणदास नैताम आदिंसह तालुक्यातील राकाँ पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !