MSPnews: शेतकऱ्यांनो, मोदी सरकारचा मोठा निर्णय!

0


धान, कापुस, सोयाबीनसह सर्वच पिकांच्या हमीभावात वाढ..


DELHI। 07 JUNE 2023
केंद्र सरकारने बुधवारी (दि. ७) खरीप हंगाम २०२३-२४ यासाठी किमान आधारभूत (MSP) किंमती जाहीर केल्या. केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाने आधारभूत किंमतींच्या शिफारशी सरकारला सादर केल्या होत्या, त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत आधारभूत किंमतींवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
The central government has increased the minimum support price or guaranteed price

केंद्र सरकारने २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी धनाच्या किमान आधारभूत किंमतीत म्हणजेच हमीभावात मागील वर्षीच्या २०४० प्रति हेक्टर च्या जागी २१८३ रूपये प्रति. हेक्टर अशी करत १४३ रूपयांनी वाढ केली आहे. तसेच कापसाच्या हमीभावात ६४० रुपयांची तर सोयाबीन पिकाच्या हमीभावात ३०० रूपयांची वाढ केली आहे.
तिळाच्या हमीभावात सर्वाधिक ८०५ रुपयांची तर मुगाच्या हमीभावात ८०३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
इतरही पिकांच्या हमीभावाची माहीती आपणास खालील तक्त्यात बघता येईल..

उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी खालील तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे सरकारने विपणन हंगाम 2023-24 साठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ केली आहे :-


#msp #modi #CabinetDecisions #farmer

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !