BJP : भाजपकडून लोकसभा-विधानसभा निवडणूक प्रमुखांची घोषणा!

0

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषदेत माहीती.. 

CHANDRAPUR । 08 JUNE 2023 
महाराष्ट्र भाजपचे (BJP Maharashtra) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी २०२४ लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नावाची आज घोषणा केली. 
मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली. 


चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर-वणी-आर्णी (Chandrapur-wani-arni) आणि चिमुर-गडचिरोली (Chimur-gadchiroli) असे दोन लोकसभा मतदारसंघ तसेच चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, चिमुर आणि ब्रम्हपुरी असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या लोकसभा व विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या २०२४ च्या निवडणुकीत प्रमुख म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्ह्यातील अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.


त्यानुसार चंद्रपूर लोकसभेसाठी निवडणूक प्रमुख म्हणून प्रमोद कडू तर गडचिरोली लोकसभेसाठी किसन नागदेवे यांची तर विधानसभा निवडणुक प्रमुख म्हणून चंद्रपूर विधानसभेसाठी आमदार रामदास आंबटकर, बल्लारपूर विधानसभेसाठी चंदनसिंह चंदेल, राजुरा विधानसभेसाठी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, ब्रम्हपुरी विधानसभेसाठी माजी आमदार प्रा. अतुल देशकर, चिमूर विधानसभेसाठी गणेश तर्वेकर तर वरोरा विधानसभेसाठी रमेश राजूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


वरोऱ्याचे रमेश राजूरकर हे सद्या मनसे मध्ये आहेत परंतू त्यांची भाजपा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचा लवकरच भाजप प्रवेश होईल, हे आता स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !