ताडोबात तब्बल ८७ वाघ तर १२८ बिबटे! #TadobaAndhariTigerReserve

0
काळा बिबट ठरतोय विशेष आकर्षण.. 


CHANDRAPUR। 05 March 2023
हमखास व्याघ्र दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात (Tadoba andhari Tiger Reserve) नेमके कीती वाघ आणि बिबटे आहेत याची आकडेवारी नुकतीच पुढे आली असून ताडोबात तब्बल ८७ वाघ (Tigers) तर १२८ बिबटे ( leopards) असल्याचे स्पष्ट झाले आहे.






वाघांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या ताडोबात बिबट्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.
यासोबतच विशेष म्हणजे वन्य-जीव अभ्यासक व पर्यटकांसाठी कुतूहलाचे विषय असणार्‍या काळ्या बिबट्याची (Black Leopard) ही याठिकाणी नोंद झाली आहे. व्याघ्रदर्शन आणि पर्यटनासाठी येणार्‍या अनेक देशी-विदेशी पर्यटकांना अनेकदा या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले आहे. 


भारतीय वन्यजीव संस्थेद्वारे (Wildlife Institute of India) दरवर्षी होणार्‍या अभ्यासानुसार ताडोबात वाघांपेक्षा बिबट्यांची संख्या अधिक दिसून येत असली तरी वाघांच्या तुलनेत बिबटे पर्यटकांना कमी प्रमाणात दिसतात. त्याला कारण बिबटे अतिशय चपळ असतात. याखेरीज वाघाची शारीरिक हालचाल अतिशय संथ असल्याने तो हमखास दृष्टीस पडतो.


ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सहा गावांचे मागील काही वर्षांत स्थलांतरण करण्यात आले. त्यामुळे ताडोबातील वन्यजीव (Wildlife) मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे स्पष्ट होते आहे. स्थलांतरित झालेल्या गावांच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर गवताळ प्रदेश व झुडपी जंगल तयार झाल्याने देखील वाघ-बिबट्यांची संख्या वाढल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे.


सन २०१२ पासून वाघ-बिबट्यांची संख्या वाढत असून श्वापदांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ वनविभागासाठी उपलब्धी मानली जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !