08 March ला ‘जागतिक महिला दिन’ का ?

0

Editorial । 08 March 2023
आज ०८ मार्च, जागतिक महिला दिन.. 
पण आजचं महिला दिन (International women's day) का साजरा करण्यात येतो? या संदर्भात आपल्यातीलचं अनेकांना पुरेशी माहिती नसते. ही वस्तुस्थिती आहे. परंतू आपणही ते जाणून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करीत नाही, हे दुर्देव आहे. असेच सुरवातीला म्हणावे लागेल.


महिला दिनाच्या औचित्याने अशाच एका ऐतिहासिक घटनाक्रमाचा वेध आपण आजच्या “संपादकीय”मध्ये घेणार आहोत.

१९१७ मध्ये रशियात महिलांनी चार दिवसांचा एक संप केला होता. ‘ब्रेड ॲंड पीस’ (Bread & Peace) ही त्यांची मागणी होती. तो दिवस होता २३ फेब्रुवारीचा!
परंतू तेव्हा रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर असल्याने त्यावेळी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये तारीख होती ०८ मार्च (०8 March) म्हणजेच आजची! 
आणि आजच्याचं दिवशीची ही घटना मानून संपूर्ण जगात आज रोजी ‘जागतिक महिला दिन’ (International women's day) साजरा केला जातो. 
खरेतर, साम्यवादी विचारसरणीमुळे जगापासून फारकत घेतलेल्या रशियाच्या बहुतांश क्षेत्रातल्या योगदानांबद्दल आपल्याला माहिती नाही. मग ते योगदान युध्दभूमीवरचे असो किंवा अवकाशातले! आपण पश्चिम युरोपात म्हणजे खासकरून ब्रिटन (britain) अमेरिकेकडे (america) यातले ‘पायोनियर्स’ पहायला जातो पण रशियाला मुद्दाम विसरतो. 

म्हणजे बघा ना? 
अवकाशात गेलेल्या पहिल्या स्त्रीचे नाव काय? ती कोणत्या देशाची होती? आणि ती केव्हा गेली? असे विचारल्यास आपल्याला गुगल किंवा विकिपीडिया शिवाय पर्याय नाही. 
उत्तरादाखल म्हणून ढोबळमानाने आपण कल्पना चावला (kalpana chawla) किंवा सुनिता विल्यम्स (sunita williams) असे भारतीय नाव घेऊन मोकळे होऊ! परंतू हे उत्तर संपूर्ण चूकिचे आहे.

ज्यांना ‘नासा’चा (NASA) इतिहास माहीत आहे ते सांगतील १९८३ मध्ये गेलेली सॅली राईड (Sally Ride) पण हेही चूक आहे. कारण अवकाशात गेलेली पहिली स्त्री होती व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा (Valentina Tereshkova) आणि सोव्हिएट रशियाने तिला १९६३ मध्ये पाठवल होतं.
वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी म्हणजे १६ जून १९६३ रोजी व्हॅलेंटिना ‘व्हॉस्टॉक ६’ ह्या रॉकेटमधून  अवकाशात झेपावली. जे की एक सोलो मिशन होतं. म्हणजे सोबत कुणीही नाही. 
जवळपास ३ दिवस. म्हणजे ४८ तास पृथ्वीप्रदक्षिणा करून ती १९ जूनला परत आली.


तिने अवकाशात घालवलेला वेळ (सुमारे ३ दिवस) हा त्यावेळच्या ‘नासा’ च्या सगळ्या अमेरिकन ॲस्ट्रोनॉटसनी त्यांच्या सगळ्या अवकाशात काढलेल्या मिशन्सच्या एकूण वेळापेक्षा जास्त होता. ही अधिक गोष्ट महत्वपूर्ण आहे. आणि अजूनही जगातली सर्वात तरूण स्त्री कॉस्मोनॉट असण्याचा मान तिलाच जातो. 

व्हॅलेंटिनाचा जन्म ६ मार्च १९३७ चा. परवाच ती ८६ वर्षांची झाली. एका साध्या कापडकारखान्यात कामगार असलेली व्हॅलेंटिना तिच्या स्कायडायव्हिंगच्या प्रेमामुळे अवकाशक्षेत्राकडे आकृष्ट झाली. १९६३ मध्ये रशियन कॉस्मोनॉट प्रोग्राम मध्ये रुजू झालेली व्हॅलेंटिना १९९७ मध्ये मेजर जनरल ह्या पदावरून निवृत्त झाली. आजही ती रशियातल्या राजकारणात ॲक्टिव्ह आहे. तिचा जन्मगाव असलेल्या यारोस्लाव्हल भागाचे नेतृत्व ती करते.


आज जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतानाचं, परवा झालेल्या वाढदिवसाच्या व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा हिला सुद्धा भरपूर शुभेच्छा..!! 


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !