NMMS शिष्यवृत्तीसाठी गुंजेवाही जिल्हा परिषद शाळेचे चार विद्यार्थी पात्र

0


इयत्ता ०९ ते १२ वी पर्यंत मिळणार प्रत्येक वर्षी १२००० ची शैक्षणिक शिष्यवृत्ती!


SINDEWAHI । 11 Feb 2023
देशातील निम्म्याहून अधिक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक कालखंडाबद्दल विचारल्यास त्यातील अनेकांकडून “होय ! मी ही जिल्हा परिषद शाळेचाचं विद्यार्थी आहे” असे उत्तर येतेच. खरेतर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा सामाजीक दृष्टीकोन फारसा चांगला नसला, तरी अनेकदा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या होतकरू गुणवंतांकडून अशा काही बातम्या येतात की अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्काचं बसतो. 

होय, अशीच काहीशी बातमी ऐकायला आली आहे ती जिल्हा परिषद हायस्कूल गुंजेवाही येथून! 




आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने घेण्यात येत असलेल्या NMMS (National Means Merit Scholarship) या शिष्यवृत्ती परीक्षेत यंदाच्या (शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी) जिल्हा परिषद हायस्कूल गुंजेवाही येथील चार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. 

रोहित हरिश्चंद्र गुरनुले (81.36%), कु. मैत्रेयी रविकांत कामतवार (76.18%), कु. अंजली घनश्याम मोहुर्ले (75.11%), आणि विक्रांत रोहिदास येरमे (58.61%) अशी या गुणवंतांची नावे आहेत. 


एकाच शाळेतील चार विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 
त्यांच्या या यशासाठी सहा. शिक्षक डॉ. प्रेमकुमार खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत सहकार्य केले. यासोबतच माजी मुख्याध्यापक विनोद कोवे, मुख्याध्यापक बशीर, सहा. शिक्षक प्रशांत खोब्रागडे, बी. एल. चरपे, तसेच इतरही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या परीक्षेत पास झाल्याने आता या गुणवंतांना पुढील शिक्षणासाठी इयत्ता ९ ते १२ पर्यंत सलग चार वर्षे वार्षिक १२०००₹ प्रमाणे चार वर्षे एकूण ४८०००₹ रूपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. 



▪️काय आहे NMMS?

National Means Merit Scholarship ही परीक्षा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती या रूपाने राष्ट्रीय परिषदेमार्फत दरवर्षी घेतली जाते. २००७ ते २००८ पासून इयत्ता आठवीच्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवता येईल. 

▪️www.mscepune.in ही NMMS ची Official Website असून इच्छुक विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावरून NMMS बद्दल अधिकची माहिती मिळवता येईल.

 ▪️महाराष्ट्र NMMS परिक्षाला अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी :

- इयत्ता आठवीचा कोणताही regular असणारा विद्यार्थी इयत्ता ०७ वी मध्ये total 55% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केल्यास तो ही परीक्षा देऊ शकतो.

- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेमध्ये 5% सूट असेल.

- उमेदवाराने शिकत असलेल्या शाळेत नोंदणी केलेली असावी. विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्याने त्या शाळेत नोंदणी केलेली असावी.

- जो विद्यार्थी या Scholorship साठी apply करत आहे त्याच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न हे 1.50 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे.

- ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती घेण्यासाठी किमान 55% मार्क्सने पास होणे आवश्यक आहे SC/ST कॅटेगिरी साठी 5% उत्तीर्ण केलेले असावी.

- विद्यार्थ्याने 10वी मध्ये कमीत-कमी 60% गुण मिळवलेले असावे. SC/ST साठी 5% किंवा ११ वी किंवा १२ वी मधील NMMS Scholorship सुरू ठेवण्यासाठी Marks जास्त असणे आवश्यक आहे. 
विद्यार्थ्याचं मागील वर्गाचे CBSE result किंवा इतर बोर्डाचे result जाहीर होताच 3 महिन्याच्या आत विद्यार्थ्यांनी पुढील class मध्ये प्रवेश मिळवणे आवश्यक आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !