CHANDRAPUR । 04 FEB 2023
शेगाव (Shegaon) येथे नुकत्याच झालेल्या माळी महासंघाच्या (Mali Mahasangh) राज्यस्तरीय शिबीरामध्ये माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष अरुण तीखे यांनी श्रीमती संध्या गुरनुले यांची माळी महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्षा म्हणून नियुक्ती केली आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या दोनदा अध्यक्षा राहिलेल्या श्रीमती संध्या गुरनूले यांना समाजात मानाचे स्थान आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील माळी समाजातील महिलांच्या एकत्रीकरणापासून सक्षमीकरणापर्यंत श्रीमती गुरनूले यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. महिला बचत गटाची स्थापना, महिला मेळाव्यांचे आयोजन, अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आजवर त्यांनी झोकून देऊन काम केले. मुल तालुक्यातील तिन्ही जिल्हा परिषद सर्कलमधून सलग पाच वेळा सदस्य म्हणून निवडून येण्याचा बहुमान त्यांच्या नावे आहे.
माळी समाजातील एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते. त्यामुळेच मागील अनेक वर्षांपासून त्या मुल तालुका भाजपच्या अध्यक्षस्थानी विराजमान आहेत.
श्रीमती संध्या गुरनुले यांच्या या नियुक्तीबद्दल प्रदेश महासचिव नानासाहेब कांडलकर, विभागीय अध्यक्ष चंद्रकांत बोरकर, राजेश जावरकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. कोकोडे, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ.संजय घाटे, निलेश खरबडे, रवी गुरनुले, वंदना तीखे, विजय राऊत, प्रा .रामभाऊ महाडोरे , भिं.तू. भेंडारे, महासचिव गुरु गुरनुले, जिल्हा सचिव गुरुदास चौधरी, डॉ.पद्माकर लेनगुरे, दिपक वाढई, बंडूभाऊ गुरनुले, प्रा. विजय लोनबले, माजी नगराध्यक्ष उषाताई शेंडे, जिल्हा कार्याध्यक्ष राकेश ठाकरे, प्रवीण मोहूर्ले, प्रा.सुधीर नागोसे, राकेश मोहूर्ले, ओमदेव, मोहूर्ले, रत्ना चौधरी, तेजस्विनी नागोसे, वंदना गुरनुले, नंदा शेंडे, माधुरी गुरनुले, राजश्री ठाकरे, आदिंसह माळी महासंघाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांचेसह ग्रामीण भागातील समाजबांधव व संघटनांनी अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे.