⭕ जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनो सावधान...!!
♻️ चंद्रपूर जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅनसन यांनी काढले पत्र...📄
चंद्रपूर, दि. २४ जानेवारी २०२३.
जिल्ह्यातील बहुतांश भाग हा दुर्गम व जंगलव्याप्त परिसरात येतो त्यामुळे आम्हाला पाहिजे तशा सुविधा गावपातळीवर मिळत नाही. त्यामुळेच आम्ही मुख्यालयीन न रहाता तालुक्याच्या ठिकाणी कुटुंबासह राहतो असा अर्धसत्य गार्हाणं मांडणार्या जिल्हा परिषद चंद्रपूरच्या कर्मचाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.
त्याला कारण असे की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विवेक जाॅनसन (IAS) यांनी जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक आदी मुख्यालयीन रहात नसल्याने ग्रामीण भागातील जनतेचे अनेक कामे रखडतात. अनेकदा बहुतांश शासकीय, शेतीविषयक तसेच शैक्षणिक कामे प्रलंबित राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे नुकसान होते. अशा स्वरूपाच्या तक्रारी वर्षोन् वर्षे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. परंतू CEO जाॅनसन यांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास विभागाचे परिपत्रक क्रमांक पंरास २०१८/प्र. क्र. ४८८/आस्था ७ दि. ०९/०९/२०२१ नुसार मुख्यालयी न राहणाऱ्या जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार पत्रातील संदर्भ क्रमांक ०१ व ०४ शासन परीपत्रकात नमूद केल्यानुसार मुख्यालयीन न राहणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांविरोधात योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि माझ्या कार्यालयाला प्रत्येक महिन्याच्या ०२ तारखेच्या आत कळविण्यात यावे, असे आदेश सर्व विभागप्रमुख तसेच गट विकास अधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत.
यासोबतच विभागप्रमुख व गट विकास अधिकाऱ्यांनी कारवाईत कसूर केल्यास त्यांच्यावरच नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असेही सीईओंनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे.
एकुणच सीईओ जाॅनसन यांचा हा निर्णय ग्रामीण भागातील लोककल्याणकारी कामांना प्राधान्य देणारा असल्याने जिल्ह्यातील जनतेने याचे स्वागत केले आहे. तथापि आता किती अधिकारी/कर्मचारी सीईओंच्या या आदेशाचे पालन करतात हे बघणे देखील महत्वाचे ठरणार आहे.