▪️मार्गदर्शन शिबिरात शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक योजनांची माहिती.
▪️ कृषिविषयक योजनांचा लाभ घेण्याचे तालुका कृषी अधिकारी खंडाळे यांचे आवाहन.
ब्रम्हपुरी -: 26 जानेवारी 2023
तालुका कृषी विभाग ब्रम्हपुरी व विंद्यगिरी फार्मर प्रोड्यूसर कंपनी आवळगाव यांचे संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांकरिता विविध कृषी विषयक योजनांची माहिती देण्याकरिता शेतकरी मार्गदर्शन शिबिर आज सोमवारी ( 24 जानेवारी 2023) ला पार पडले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी अधिकारी श्री पि.डी.खंडाळे, कंपनीचे एमडी देविदास लांजेवार, नोडल अधिकारी श्री एस.एम.दहिवले, आत्माचे तांत्रिक अधिकारी अमित हातझडे, कृषी सहायक एन. पी. सरकटे, माजी जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई दर्वे, संचालक मनोहर मेश्राम, योगेंद्र सुर्यवंशी, संतोष पोहणकर,माजी सरपंच दिनकर चूधरी, केवळराम नरूले, वैनगंगा दुग्ध विकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष आबाजी तिवाडे, व सभासदांची उपस्थिती होती.
कंपनीच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबीर आवळगाव व लगतच्या अन्य गावातील कंपनीच्या सभासदांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी तालुका कृषी अधिकारी खंडाळे यांनी, शेतकऱ्यांना कृषी विषयक योजना बाबत मार्गदर्शन केले. सरकारने 148 प्रकारच्या विविध कृषी विषयक योजना शेतकऱ्यांच्या हिताकरिता सुरू केलेल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली आर्थिक प्रगती साधता येवून जीवनमान उंचावता येते. त्यामुळे शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांवर लक्ष केंद्रित करून कृषी विषयक योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री खंडाळे यांनी केले. यावेळी नोडल अधिकारी श्री दहिवले यांनीही विविध कृषी विषयक योजनांवर माहिती दिली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
मार्गदर्शन शिबिराचे संचालन व आभार कृषी सहायक सरकटे यांनी केले.