चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी सफाई कामगारांचे लाक्षणिक साखळी उपोषण सुरू..
चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी सफाई कामगार हे १५ ते २० वर्षांपासुन सेवा देत आहेत पण त्यांना कोणतीही पुर्वसुचना न देता कामावरून कपात करण्यात आले. या विरोधात दि. २८ नोव्हेंबर २०२२ पासुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांच्या नेतृत्वाखालील हे कंत्राटी सफाई कामगार आपल्या विविध मागण्या घेऊन जिल्हा परिषद चंद्रपूर समोर साखळी उपोषणाला बसले आहेत.