ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची परवानगी द्यावी : मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

0




मुंबई, दि. ०१ डिसेंबर २०२२   
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयोगाने सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देखील दिले आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २८ नोव्हेम्बर ते २ डिसेम्बर या कालावधीत उमेदवारांकडून  अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविणयात आले आहे.३० नोव्हेम्बर पासून आयोगाची वेबसाइट अतिशय मंदगतीने सुरु असल्याने उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, ते अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकत नाहीत .त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सांस्कृतिक  कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.








Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !