परीसरातील जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी आयोजकांचे आवाहन.
सिंदेवाही, दि. २८ नोव्हेंबर २०२२.
तालुक्यातील गुंजेवाही येथे समाजाच्या विकास होऊन प्रगतीची कास धरता यावी. आणि त्यामाध्यमातून माळी समाजाची सामाजिक संघटना बळकट व्हावी. या दृष्टीने माळी समाज गुंजेवाहीच्या वतीने आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन आज स्थानिक जगदंबा नाट्य मंडळाच्या भव्य आवारात केल्या गेले आहे.
या सुनियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि. प. सदस्य रूपाताई सुरपाम आणि उद्घाटक म्हणून माजी पं. स. सदस्य राहुल पोरड्डीवार हे असून याठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वसंत टेकाम, विरेंद्रकिशोर सिरमोरिया, प्रेमकुमार खोब्रागडे, गुरूदास शेंडे, उपसरपंच शालिनी गुरनुले, प्रा. धनंजय वाढई, मुख्याध्यापक एम. बि. बशीर, ग्रा. पं. सदस्य सादिक शेख, छाया कोडापे, पपीता गुरनुले, चंद्रकांत मोहुर्ले, पुणेश गांडलेवार, अर्चना येरमे, होमकांत वालदे, सुषमा जराते पो. पा. वंदना चन्ने, शोभा भेंडारे, तं.मु.स. अध्यक्ष आशिष भानारकर, शैलाताई सोनुले, सुनंदा लोणबले, कोवे सर, प्रशांत खोब्रागडे, मुकेश वाडगुरे,अरुण माधेशवार, सदाशिव वाडगुरे हे असणार आहेत.
या मेळाव्याला उपस्थिती दर्शवून होणार्या प्रबोधनाचा लाभ परिसरातील जनतेनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन माळी समाज गुंजेवाहीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रबोधनाची सांगता झाल्यानंतर गावातून फेरी काढण्यात येऊन शेवटी महाप्रसाद ठेवण्यात आले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दौलत लेनगुरे, प्रभाकर वाडगुरे, कवडू वाडगुरे, पांडुरंग चौधरी, पुंडलिक शेंडे, सुधाकर मोहुर्ले व हरिदास जेंगठे यांचेसह आदी मंडळी परीश्रम घेत आहेत.